Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली.
पाटणा : बिहार विधानसभा (Bihar vidhansabha) निवडणुकांसाठी मतदानाची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, आता येथील राजद, काँग्रेस महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. महाआघाडीने राजदचे प्रमुख आणि माजी मंत्री तेजस्वी यादव (Tejaswi yadav) यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले आहे. बिहार विधानसभा 2025 साठी महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा (Chief minister) चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव घोषित केल्यानंतर जनशक्ती जनता दलचे प्रमुख आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने अनकेांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार, राजदचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील आणि विकासशील इंसान पार्टी (वीआईपी) चे प्रमुख मुकेश सहनी उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, बिहारमध्ये महाआघाडीकडून दोन महत्त्वाच्या पदासाठी नावे जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसला काय मिळणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यास एनडीएप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसला देखील उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते किंवा विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसला संधी मिळू शकते.




