महाराष्ट्र

Gulabrao Patil: दुष्काळ पडला तरी अन् नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात; बाबासाहेब पाटलांनंतर शिंदे गटाच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Gulabrao Patil: दुष्काळ पडला तरी अन् नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेय.

Gulabrao Patil: महायुतीतील (Mahayuti) नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं थांबायचं नाव घेत नाहीत. नुकतेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दुष्काळ पडला तरी अन् नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात, असे त्यांनी म्हटले आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gulabrao Patil: नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खान्देश शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांना शिव्या देतात. शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच, आम्ही पण कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही सुद्धा संघर्षातून वर आलेलो आहोत. आम्हाला  लोकांनी गद्दारच करून टाकलेलं आहे. आम्ही बदनामीचा विचार करत नाही. आम्ही फक्त एवढाच विचार करतो की, आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Babasaheb Patil: बाबासाहेब पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले होते की, लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय. एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनिल भाईदाससारखा माणूस गेला, लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ठरवावं ना. अनिल भाईदास म्हणाले, नदीही देऊन टाकू. म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीदेखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button