Sushma Andhare on Yogesh Kadam: योगेश कदमांकडून गुंडाला अभय, सुषमा अंधारेंकडून गृहराज्यमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल; सचिन घायवळच्या गुन्हेगारीची कुंडलीच देत म्हणाल्या…

Sushma Andhare on Yogesh Kadam: योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही. तात्काळ गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Sushma Andhare on Yogesh Kadam: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंधारे यांनी मंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) भावाला सचिन बन्सीलाल घायवळ (Sachin Ghaywal) याला शस्त्र परवाना दिला, जो कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे, असा दावा केला आहे.
सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस शस्त्र परवाना देणे म्हणजे थेट गुन्हेगारीला अभय देण्यासारखे आहे. या प्रकरणात मंत्री कदम यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गुन्हेगाराला बळ दिले, असा आरोप करत अंधारे म्हणाल्या, “त्यांनी पदाचा गैरवापर करत गुंडाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही, असे म्हणत त्यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Sushma Andhare on Sachin Ghaywal: सचिन घायवळवर मकोकाअंतर्गत गुन्हे
सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, काल कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मकोकाअंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता.




