Uncategorized

Indias Richest Bollywood Actor: शाहरुख खान सोडा, ‘या’ अभिनेत्यानं श्रीमंतीत अमिताभ बच्चन, करण जौहरलाही दिलीय मात, सांभाळतोय ₹7,79,00,00,000 साम्राज्य

Indias Richest Bollywood Actor: किंग खाननं अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ज्यामध्ये टेलर स्विफ्ट आणि सेलेना गोमेझ यांसांरख्या बड्या हॉलिवूड स्टार्सचाही समावेश करण्यात आला आहे.

Indias Richest Bollywood Actor: बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood Superstar) शाहरुख खान (Shah Rukh Khan)) अधिकृतपणे अब्जाधीश झाला आहे. 12,490 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तो अब्जाधीशांच्या यादीत सामील झालाय. 1 ऑक्टोबर रोजी बुधवारी जगभरातील श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये शाहरुख खानचं नाव सर्वात अव्वल स्थानी आहे. किंग खाननं अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ज्यामध्ये टेलर स्विफ्ट आणि सेलेना गोमेझ यांसांरख्या बड्या हॉलिवूड स्टार्सचाही समावेश करण्यात आला आहे.

एम3एम हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, शाहरुख हा यादीतील सर्वात श्रीमंत बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाकडे रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे आणि आयपीएल फ्रँचायझीची सह-मालकीसह विविध क्षेत्रात गुंतवणूक आहे. त्यानं अल्कोहोल कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि मुंबईत मन्नत, बेव्हरली हिल्समध्ये एक व्हिला, अलिबागमध्ये एक फार्महाऊस आणि लंडन आणि दुबईमध्येही त्याची मालमत्ता आहे.

शाहरुख खाननंतर जुही चावला सर्वात श्रीमंत 

श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत सिनेअभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आहे. तिची एकूण संपत्ती 7,790 कोटी इतकी आहे. एवढंच नाहीतर जुही चावला आयपीएलचा संघ कोलकाता नाईट रायडर्समध्ये शाहरुखची व्यावसायिक भागीदार देखील आहे. श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीनुसार, अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबाची संपत्ती सेलिब्रिटींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमिताभ बच्चन, करण जोहर यांच्यापेक्षा हृतिक रोशन पुढे 

याव्यतिरिक्त, हृतिक रोशन (Hrithik Roshan) 2,160 कोटींच्या एकूण संपत्तीसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हृतिकच्या व्यवसायात लाईफस्टाइल आणि फिटनेस ब्रँड HRX चा समावेश आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं त्याच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरसह 1,880 कोटींची मालमत्ता जमवली आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचं कुटुंब देखील पहिल्या पाचमध्ये आहे, ज्यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी आहे.

हॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही किंग खान श्रीमंत 

इंटरनेशनल स्टार्सबाबत बोलायचं झालं तर,  टेलर स्विफ्ट ($1.3 बिलियन), अर्नोल्ड श्वार्ज़नेगर ($1.2 बिलियन), जेरी सीनफील्ड ($1.2 बिलियन) आणि सेलेना गोमेज ($720 मिलियन) बॉलिवूडचा किंग शाहरुख खानपेक्षा मागे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button