Russian Crude Oil : भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास तयार, अमेरिकेपुढं ठेवली मोठी अट, ट्रम्प आता काय करणार?

Russian Crude Oil Imports : भारतानं रशियाकडून सुरु असलेली तेल खरेदी थांबवण्यास तयार असं म्हटलं असून अमेरिकेपुढं एक अट ठेवलीय.
भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलेलं आहे. 25 टक्के बेस टॅरिफ शिवाय अतिरिक्त 25 टॅरिफ रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळं अमेरिकेनं भारतावर लादलं आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास तयार असल्याचं अमेरिकेला सांगितलं आहे. मात्र, त्यासाठी एक अट ठेवली आहे. इराण आणि वेनेझुएलाकडून तेल आयात करण्यास अमेरिकेनं परवानगी द्यावी, असं भारतानं म्हटलंय.
यूक्रेन विरूद्धच्या युद्धामुळं पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. यामुळं रशियानं कमी दरात तेल विक्री सुरु केली. भारत आणि चीन रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. भारत एकूण गरजेच्या 90 टक्के तेल रशियाकडून आयात करते. रशिया कमी दरात तेल पुरवठा करत असल्यानं भारताचा तेल आयातीवरील खर्च कमी होतोय.
भारताला रशियाप्रमाणं इराण आणि वेनेझुएलाकडून कमी दरात खनिज तेल मिळू शकतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेरिका दौऱ्यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनासमोर तेल आयातीसंदर्भात जोरदार बाजू मांडली.
रशियाकडून तेल खरेदी कमी करायची असल्यास भारतीय रिफायनर्सला इराण आणि वेनेझुएला यांच्याकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेनं परवानगी द्यावी. कारण या दोन्ही देशांवर सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. H1-B व्हिसासाठी अर्ज करण्याची फी देखील 1 हजार डॉलर्सवरुन 1 लाख डॉलर्स केली आहे. अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादूनही भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवलीय.
न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संकेत दिले की भारताला अमेरिकेकडून तेल आणि गॅस खरेदी वाढवत आहोत. आमच्या ऊर्जांची गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिकेचं मोठं योगदान राहील,असं गोयल म्हणाले.




