महाराष्ट्र

Agni-Prime Missile : भारताची ऐतिहासिक झेप! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी, 2000 किमीची मारक क्षमता, शत्रूंचं टेन्शन वाढणार

Agni-Prime Missile : ‘अग्नी-प्राईम’ हे नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र असून त्याची कमाल मारक क्षमता तब्बल 2000 किमी आहे.

Agni-Prime Missile : भारताने आज एक ऐतिहासिक कामगिरी करत अंतरमध्य पल्ल्याच्या ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे हे क्षेपणास्त्र प्रथमच रेल्वेवर आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टमवरून (Rail-based Mobile Launcher) प्रक्षेपित करण्यात आले. या प्रक्षेपणानंतर भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या यादीत सामील झाला आहे.

2000 किमी पल्ल्याची क्षमता

‘अग्नी-प्राईम’ हे नवीन पिढीचे (Next-Generation) क्षेपणास्त्र असून त्याची कमाल मारक क्षमता 2000 किमी आहे. या क्षेपणास्त्रात कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टीम, अचूक मार्गदर्शन प्रणाली आणि वेगवान प्रतिसाद क्षमतांसह (Quick Reaction Capability) इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे क्षेपणास्त्र स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या वापरासाठी विकसित करण्यात आले असून DRDO ने त्याची रचना व विकास केला आहे.

रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर: भारताची नवी ताकद

या चाचणीत वापरलेली स्पेशली डिझाईन केलेली रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर सिस्टीम भारतासाठी एक नवे सामरिक बळ आहे. ही प्रणाली कोणत्याही पूर्वतयारीशिवाय देशभरातील रेल्वे नेटवर्कवरून सहजतेने हलवता येते. त्यामुळे युद्धपरिस्थितीतही कमीत कमी वेळेत आणि लपवून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते, जे शत्रूसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button