‘…तर कबूतरखान्यांसमोर मटण शॉप काढू ‘ मुंबईत कबूतरखान्यांवरून पुन्हा वादाची ठिणगी ? लोढांच्या भूमिकेवर कोण मैदानात ?

आता जिथे कबूतरखाने उभारले जातील तिथे मटण – चिकन शॉप सुरू करू असा इशाराच या संस्थेनं BMC ला दिलाय . या संदर्भात त्यांनी पत्रही लिहिलय .
Mumbai:मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद मध्यंतरी चांगलाच भडकला होता . दादरचा कबूतर खाना बंद झाला आता सगळं शांत होईल असं वाटत असतानाच भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत नव्या कबूतर खान्याचं उद्घाटन केलं . त्याची सोशल मीडियावर पोस्टदेखील टाकली .त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जैन वाद पेटण्याची शक्यता आहे . मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये एक ऑफिशियल कबूतरखाना असावा अशी अपेक्षा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली होती. लोढांच्या या भूमिकेवरून आम्ही गिरगावकर या संस्थेने आक्रमक भूमिका घेतलीय . आता जिथे कबूतरखाने उभारले जातील तिथे मटण – चिकन शॉप सुरू करू असा इशाराच या संस्थेनं BMC ला दिलाय . या संदर्भात त्यांनी पत्रही लिहिलय .
नेमका वाद काय ?
मुंबईतील कबूतर कबूतरखान्यांवरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू असल्यास पाहायला मिळतंय .मुंबई हायकोर्टानेही कबूतर खान्यांवरील बंदी कायम ठेवलेली असताना भाजप मंत्री व मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आता पुन्हा एकदा कबूतर खान्याचं उद्घाटन केल्यानं नवा वाद सुरु झालाय . मुंबईतील प्रत्येक वॉर्डात कबूतर असावेत अशी आपली अपेक्षा असल्याचं वक्तव्य लोढांनी केल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडलीय . लोढांच्या या भूमिकेनंतर आम्ही गिरगावकर या संस्थेने आक्रमक भूमिका घेत आपला मराठी बाणा दाखवून दिलाय .आता जिथे जिथे कबूतरखान उभारले जातील तिथे तिथे चिकन मटन सेंटर उभारले जातील असा इशारा या संस्थेने दिला आहे . लोढा यांनी आता जो कबूतरखान्यांचा खेळ सुरू केलाय ..हा डाव हाणून पाडू असा इशाराही या संस्थेने दिलाय .मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा खेळ सुरू केल्याचा आरोपही आम्ही गिरगावकर या संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी केला आहे .
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोरिवली नॅशनल पार्कच्या परिसरातील तीनमूर्ती जैन मंदिराच्या आवारात एका कबुतरखान्याचं उद्घाटन केलं. हा कबुतरखाना जैन धर्मीयांनी उभारला असून, लोढांनी उद्घाटनानंतर त्याची माहिती सोशल मीडियावरही शेअर केली. यावेळी अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, एकीकडे कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर सरकारमधील मंत्रीच स्वतः कबुतरखाने सुरू करत असतील, तर काय? मंत्री लोढांनी यावेळी स्पष्ट केलं की, मुंबईतील कबुतरखाने सुरू राहतील, असं त्यांचे विधान वादाची ठिणगी बनले आहे. लोढांच्या या भूमिकेवर पहिला विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून समोर आला तर दुसरा इशारा ‘मी गिरगावकर’ या संस्थेने दिला आहे.




