महाराष्ट्र

Pune Crime Andekar case: ‘खून का बदला खून’; आंदेकर टोळीकडून रेकी अन् ट्रॅप, वेपन घेऊन गेम करणार इतक्यात… पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे डाव उधळला

Andekar murder case: वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता.

पुणे: पुण्यातील वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होत असताना पोलीसांनी त्याच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ज्यामुळे पुण्यातील टोळी युद्धाचा भडका उडण्याची धोका सध्या तरी टळला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी केली होती. वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्याने कट उधळला गेला. या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर गट व सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर मागील काही वर्षांपासून पेटलेलं आहे. २०२३ मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाला; तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेण्यासाठी टपून होती. त्यातून बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा २०२४ च्या १ सप्टेंबर रोजी डोके तालीम भागात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या हत्येने पुण्यात खळबळ उडाली होती. वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा “गेम” उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात तयार झाली आहेत.

वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडसह २३ जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ते तुरुंगात असले, तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेला होता. पोलिसांनी एकाला पकडून कट मोडीत काढला आहे.

कृष्णाला व्हॉट्सअॅपद्वारे दिली माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आंदेकर याने खोलीसाठी पाच हजार रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठविल्यानंतर ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता काळेने वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींची घरे पाहिली. त्याची माहिती त्याने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो, असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेने परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.

पाच ‘वेपन’ घेऊन पाठविले

कृष्णाने कॉल न घेतल्यामुळे काळेने यश पाटील याला कॉल केला. त्या वेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो, असे म्हटले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता काळेला कॉल करून सात ते आठ जणांना पाच वेपन घेऊन पाठवले आहे असे सांगितले तर अमळने कॉल करून लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा असे कळवले होते त्यामुळे आंदेकर टोळी नेमका कोणाचा गेम वाजवणार होती याचा पोलीस शोध घेत आहेत या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडे देण्यात आला आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button