मयताला खांदा सुद्धा देण्याचं काम, अनेकांनी साथ सोडूनही मुंबईत शिवसेनेला भरपूर मते पडतात, ठाकरेंच्या शिवसेनेकडून खूप काही शिकण्यासारखं; खासदार विशाल पाटलांकडून कौतुक

Vishal Patil on Shivsena: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या मुंबईमधील शिवसेनेच्या सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले.
Vishal Patil on Shivsena: उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप लोकांनी सोडून देखील मुंबईमध्ये शिवसेनेला भरपूर मते पडतात. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या मुंबईमधील शिवसेनेच्या सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार विशाल पाटील यांनी हे विधान केले. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारामुळेच विशाल पाटील यांना अपक्ष खासदारकीची निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खासदार विशाल पाटील यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतून विरोध करत स्वतःच्या पक्षाकडे उमेदवारी घेतली होती. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना चित्रपट करत विशाल पाटील पहिल्यांदाच खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाले होते.




