महाराष्ट्र

Uddhav Thackeray visit Raj Thackeray Ganpati: गणपती बाप्पाने ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणलं, उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, दुपारी एकत्र जेवणार

Uddhav Thackeray visit Raj Thackeray Ganpati: उद्धव ठाकरे हे गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले आहेत. गणपती बाप्पााने भावांना एकत्र आणलं

Uddhav Thackeray & Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठरत असलेले ठाकरे बंधू आज गणेशोत्सवाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे हे बुधवारी सकाळी मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थ येथे दाखल झाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आहेत. उद्धव ठाकरे हे आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवणार आहेत.

यापूर्वी 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray Brotehrs) मनोमिलन झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन महत्त्वाचे आहे. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हेदेखील राज यांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू आता मनाने एकत्र आल्याचे संकेत मिळत आहेत. शिवतीर्थवरील आजच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज ठाकरे हे यापूर्वी दादरच्या शिवाजी पार्कमधील कृष्णकुंज या वास्तूमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी आपला मुक्काम शेजारीच नव्याने उभारण्यात आलेल्या शिवतीर्थमध्ये हलवला होता. राज ठाकरे हे कलासक्त असल्याने त्यांनी शिवतीर्थ हे निवासस्थान सुंदर पद्धतीने सजवले आहे. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्याने उद्धव ठाकरे हे कधीही शिवतीर्थवर आले नव्हते. मात्र, आता गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी आले आहेत. या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गट निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button