50 वर्षांच्या लढ्याचे शिवधनुष्य सरन्यायाधीशांनी समर्थपणे पेलले, सर्किट बेंचनं विकासाचं दालन उघडलं, कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश काम करत राहू; सीएम देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. भूषण गवई यांचे कोर्ट परिसरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
CM Devendra Fadnavis on Kolhapur Circuit Bench: तब्बल 42 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज (17 ऑगस्ट) कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्ती झाली. कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. भूषण गवई यांचे कोर्ट परिसरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारत, ताराबाई इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालय मूर्ती अलोक आराध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोर्टरुमची पाहणी केली. यानंतर सर्व मान्यवर मेरी वेदर ग्राउंडवर मुख्य सोहळ्यासाठी पोहोचले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खंडपीठ लढ्याची चित्रफित दाखवण्यात आली. सरन्यायाधीशांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचे चरणस्पर्श करून अनेक मान्यवरांनी त्यांचा आशीर्वाद घेतला.




