आता पाकिस्तानचे फक्त पाणी बंद केलंय, अन्नधान्यही बंद करु शकतो, नवनीत राणांचा हल्लाबोल

पाकिस्तानच्या भुट्टोने भारतात येऊन दाखवावं, मग बघा त्याचे काय हाल करतो असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला
Navneet Rana : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) या नावाने आपली दहीहंडी आहेत. पाकिस्तानमध्ये (Pakistan) बसून खूप नारे लावत आहेत. पण पाकिस्तानच्या भुट्टोने भारतात येऊन दाखवावं, मग बघा त्याचे काय हाल करतो असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला. खुद कें घर मे कुत्ता भी शेर बनता है. नवनीत राणा फायर आहे फ्लावर नही असेही त्या म्हणाल्या. या देशात काँग्रेसच राज नाहीतर या देशात पंतप्रधान मोदी यांचे राज्य असल्याचे त्या म्हणाल्या.
नवनीत राणा एकाच माणसासमोर झुकते ते फक्त रवी राणा
आता पाकिस्तानचे फक्त पाणी बंद केले आहे, अन्नधान्य पण बंद करु शकतो नंतर भारताच्या समोर कटोरे घेऊन भीक मागण्यासाठी असा हल्लाबोलही नवनीत राणा यांनी केला. बाप तो बाप रहेगा, हिंदुस्तान बाप रहेगा असे त्या म्हणाल्या. पाकिस्तान मुर्दाबाद.. पाकिस्तान सैनिक मुर्दाबाद, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा एकाच माणसासमोर झुकते ते फक्त रवी राणा असंही त्या म्हणाल्या.
अमरावतीच्या दहीहंडी उत्सवात अभिनेता रणदीप हुडा यांनी उपस्थिती लावली आहे. युवा स्वाभिमान आणि भाजप कडून विदर्भस्तरीय दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या या दहीहंडीत अनेक अभिनेते हजेरी लावणार आहेत. याठिकाणी भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दहीहंडीत उत्सवासाठी उपस्थित राहिले आहेत.




