महाराष्ट्र

उलटी गंगा, भाजपलाच खिंडार, माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, या जिल्ह्यात काय घडतंय ?

हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हजारो समर्थकांसह काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता भाजपलाही खिंडार पडण्यास सुरूवात झाली असून माजी मंत्री काँग्रेसमध्ये आलेत.

आधी लोकसभा निवडणुका, त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महारार्षअटार नेक राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगला वेग आला होता. मात्र बहुतांश इनकमिंग हे महायुतीच्या पक्षांमध्ये होत होतं, त्यातही प्रामुख्याने भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही आयारामांची संख्या वाढत होती. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस , राष्ट्रवादी शरद पवार गट यातून अनेक नेते, पादधिकारी, कार्यकर्ते हे बाहेर पडत असल्याचे चित्र आजपर्यंत दिसत असतानाच आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण आता उलटी गंगा वाहू लागली असून बाजपलाच खिंडार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

नंदूरबार जिल्हात भाजपला मोठा धक्का बसला असून बाजपाचे माजी नेते आणि मंत्र्याने काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नव्हे तर नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी हे आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मात्र खिंडार पडण्यास सुरूवात झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पद्माकर वळवी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दिपक अहिरे तसेच बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण व काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button