महाराष्ट्र

BJP on Pranjal Khewalkar Case : प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप, म्हणाले, अनेक वर्षांपासून…

BJP on Pranjal Khewalkar Case : पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला होता. यात अटक झालेल्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे.

BJP on Pranjal Khewalkar Case : पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी एका हॉटेलवर छापा टाकून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा (Pune Rave Party) पर्दाफाश केला. या कारवाईत अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचाही समावेश आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या आणि खेवलकरांच्या पत्नी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी या प्रकरणात राजकारणाचा आरोप भाजपवर केलाय. आता  भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी (Vijay Chaudhari) यांनी या प्रकरणावरून खळबळजनक आरोप केलाय. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांच्या वारसा चालवत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रांजल खेवलकरांचे अनेक वर्षांपासून काळे धंदे

भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी म्हणाले की, प्रांजल खेवलकर यांचे रंगरंगीले खेळ हा उभा महाराष्ट्र पाहतोय. ज्या पद्धतीने खडसेंचे जावई खेवलकर यांनी अनेक महिलांना चित्रपटाचे, नोकरीचे आमिष दाखवून त्यांची पिळवणूक केली, त्यांचा छळ केला, त्यांचं लैंगिक शोषण केलं, ही बाब अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी या संदर्भात खडसेंचे जावई खेवलकर यांना अटक केलेली आहे. जी काही तपासामध्ये माहिती समोर येत आहे ती अतिशय गंभीर आहे. खेवलकर यांचे अनेक वर्षांपासून काळे धंदे सुरू होते. ते पोलीस तपासात पुढे येत आहे. जवळपास 252 व्हिडिओ आणि 1497 च्या आसपास फोटो पोलिसांना सापडले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचाच वारसा चालवताय

एकनाथ खडसे यांचा जावई खेवलकर हा खडसे अर्थात सासरेबुवांचा वारसा पुढे चालवत आहे. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करेल की, या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे आणि  जनतेसमोर सर्व बाहेर आला पाहिजे. पोलीस तपासात समोर आले आहे की, खेवलकर रेव्ह पार्टीत सापडले आहे. त्यामुळे खेवलकर प्रकरण आणि राजकारण याचा काहीही संबंध नाही, असे देखील विजय चौधरी यांनी म्हटले आहे. आता विजय चौधरी यांच्या आरोपावर एकनाथ खडसे नेमका काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button