नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनी संदर्भात मुख्यमंत्री यांच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयात नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज,कोल्हापूर मठाचे मठाधिपती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज,

नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनी संदर्भात मुख्यमंत्री यांच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयात नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज,कोल्हापूर मठाचे मठाधिपती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज,वरुर मठाचे मठाधिपती धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज,तिजारा मठाचे मठाधिपती सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज यांच्यासोबत माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील(यड्रावकर) साहेब व माजी आमदार प्रकाश आवाडे यांची महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला मठात परत आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या महादेवी हत्तीणीसंदर्भात माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक पार पडली.
⚖️ मुख्यमंत्री महोदयांनी नांदणी मठ व राज्य शासनातर्फे रिट पिटीशन दाखल करण्याची घोषणा केली आहे.
🛑 तसेच माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) साहेब यांच्या मागनीनुसार या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, ते सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही दिले आहे.*
💫 शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे महादेवी हत्तीण परत येण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत!





