श्री घोडेगिरी बिरदेव मंदिर अर्जुनवाड परिसरात वृक्षारोपण सोहळा शिरोळचे तहसीलदार श्री अनिलकुमार हेळकर यांच्या हस्तेसंपन्न

अर्जुनवाड प्रतिनिधी
अर्जुनवाड ता. शिरोळ येथील श्री घोडेगिरी बिरदेव मंदिर परिसरात शिरोळचे तहसीलदार श्री अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक शिरोळचे तहसीलदार श्री अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन, हवामानातील बदल वाढते प्रदूषण, अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी व प्रत्येकांनी एक तरी झाड लावून संगोपन केले पाहिजे असे मत शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अर्जुनवाडच्या नूतन सरपंच भारतीताई परीट उपसरपंच विकास पाटील,शिरोळ चे मंडल अधिकारी विनायक आरगे,अर्जुनवाड चे तलाठी सत्तार गवंडी, कोतवाल महादेव पवार,पोलीस पाटील सचिन कांबळे,तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष दुधाळे, देवऋषी शंकर डोंगरे, तुकाराम डोंगरे, रंगराव डोंगरे, बजरंग डोंगरे, शिवाजी डोंगरे, गणेश परीट, मंगेश देसाई, दिनकर दुधाळे, गंगाराम डोंगरे आदी सह. धनगर समाजातील बांधव, गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.