Shani Shingnapur News: शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांचं टोकाचं पाऊल, गळ्याला दोर लावला अन्….

Shani Shingnapur Temple news: शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या निधनामुळे शनि शिंगणापूरमध्ये शोककळा पसरली आहे.
Shani Shingnapur News: अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नितीन शेटे (Nitin Shete) यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरात छताला दोर टांगून गळफास (Suicide news) घेतला. या घटनेमुळे शनि शिंगणापूरमध्ये (Shani Shingnapur) खळबळ उडाली आहे. नितीन शेटे हे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे या परिसरात त्यांचा चेहरा अनेकांना परिचित होता. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर शनि शिंगणापूरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आहे. या घटनेमुळे शनि शिंगणापूर गावावर शोककळा पसरली आहे.
नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक होते. नितीन शेटे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी त्याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूनर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु होती. महिनाभरापूर्वी 114 मुस्लीम कर्मचारी घेतल्यामुळे शनि शिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तसेच देवस्थानाचे बनावट अॅप तयार करुन पैशांची अफरातफर झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारकडून शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर येथे मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात ही माहिती दिली होती. आमदार विठ्ठल लंघे यांनी याविषयी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती.




