सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा; विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray On Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ? विधानभवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंची उद्गिग्न प्रतिक्रिया, कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र? जनतेला राज ठाकरेंनी सवाल केला आहे.
Raj Thackeray On Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय गुरुवारी संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. आता याच प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रितिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन घडलेल्या प्रकाराबाबत आगपाखड केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?, कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र? अशी उद्गिग्न प्रतिक्रिया विधानभवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंनी दिली आहे. वाट्टेल त्या लोकांना पक्षात घेण्यानं असं घडतंय, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला,’ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?’
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका