गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?

गुरुपोर्णिमा उत्सवात शिर्डीतील साईंच्या चरणी मोठ्या प्रमाणात गुरुदक्षिणा जमा झाली आहे. गेल्या तीन दिवसात मंदिर समितीकडे तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक दान आलं आहे.
गुरुपोर्णिमा उत्सवात शिर्डीतील साईंच्या चरणी मोठ्या प्रमाणात गुरुदक्षिणा जमा झाली आहे. गेल्या तीन दिवसात मंदिर समितीकडे तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक दान आलं आहे.
गुरुपोर्णिमा उत्सवाच्या कालावधीत गेल्या तीन दिवसीय साईंच्या चरणी भाविकांनी, भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. गुरुपोर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त साई दरबारी आले होते.
दक्षिणा पेटी, देणगी काऊंटर, सशुल्क पास, डेबिट-क्रेटीट कार्ड, ऑनलाईन देणगी, मनी ऑर्डरच्या माध्यमातून हे दान साई चरणी जमा करण्यात आलं आहे.
गुरुपौर्णिमेच्या काळात साई मंदिरातील तीन दक्षिणापेटीत 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 रुपये दान जमा झाले आहे.
येथील देणगी काऊंटरवर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये, तर सशुल्क पास देणगीतून 55 लाख 88 हजार 200 रुपये प्राप्त झाले आहेत.
डेबीट -क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डी.डी.देणगी, मनी ऑर्डरच्या माध्यमातून 2 कोटी 5 लाख 76 हजार 626 रुपयांचे दान देण्यात आलं आहे.
दागिन्यांचा विचार केल्यास 57 लाख 87 हजार 925 रुपये किमतीचे तब्बल 668 ग्रॅम सोने जमा झाले आहे. तर, 5 लाख 85 हजार 879 रुपये किमतीची 800 ग्रॅम चांदी दान स्वरुपात मंदिर संस्थानकडे प्राप्त झाली आहे.
शिर्डी साई संस्थानकडे विविध माध्यमातून एकूण 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपयांची देणगी जमा झाली आहे. त्यामुळे, भाविकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भरभरुन गुरुदक्षिणा दिली आहे.