Pune Crime News: पहिले समजावले, मग वाद होताच संपवले; दारु पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा खून, पुण्यातील भयावह घटना

Pune Crime News: पुण्यातील बिबवेवाडी भागात दारु पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा खून केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News पुणे: पुण्यातील बिबवेवाडी भागात एक धक्कादायक घटना (Pune Crime News) घडली आहे. दारु पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा खून केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (24) असे मयत झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी 26 वर्षीय अनिकेत दत्तात्रय नवले याला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
प्रवीण आणि अनिकेत सख्खे भाऊ आहेत. दोघे बिबवेवाडी भागात राहतात. प्रवीण काही कामधंदा करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूसाठी पैसे मागून तो कुटुंबीयांना त्रास द्यायचा. सोमवारी (14जुलै) सकाळी प्रवीणला अनिकेत समजावून सांगण्यासाठी गेला होता. दारू पिऊन आम्हाला त्रास देऊ नको, असे त्याने प्रवीणला सांगितले. त्यावर प्रवीणने अनिकेतशी वाद घातला. वादातून अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रहिवाशांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.