MHADA : म्हाडाकडून मुंबईत 12 हजार घराची निर्मिती होणार, एकत्रित पुनर्विकासातून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार

MHADA News : येत्या काळामध्ये म्हाडाकडून एकत्रित पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध केली जाणार आहेत.
मुंबई: सर्वसामान्यांना त्यांच्या घराच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा मार्ग पुन्हा खुला होणार आहे. येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये म्हाडाकडून मुंबईतील विविध परिसरात पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून म्हाडाला 12,000 पेक्षा अधिक घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. यामध्ये गोराई, मुलुंड, कांजुरमार्ग, जुहू, बांद्रा, ओशिवरा आणि गोरेगाव आदी परिसरात घरे उपलब्ध असतील.
कुठे किती घरे?
गोरेगाव – मोतीलालनगर : या ठिकाणी म्हाडाने बांधकाम आणि पुनर्विकास संस्था म्हणून अदाणी समूहाची निवड केली आहे. त्यानुसार इथल्या रहिवाशांना 1600 चौरस फुटांची मोठी घरे उपलब्ध केली जाणार आहेत.
म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवर विकास आराखड्यानुसार सुमारे 8000 घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही घरे स्थानिक सोसायट्यांच्या सहकार्याने विकसित केली जातील.
जुहू – जेवीपीडी नगर: गुरु नानक बध्दविकास योजनेतून घरे.
2500 चौरस फूट क्षेत्रफळाचे स्पेसिअस फ्लॅट्स.
किंमत सुमारे 600–700 कोटींच्या प्रकल्पात समाविष्ट.
कांजुरमार्ग: एकात्मिक पुनर्विकास प्रकल्पातून घरांची निर्मिती.
सुमारे 5000 घरे उपलब्ध होण्याचा अंदाज.
400 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची घरं.
विविध गटांसाठी (EWS, LIG, MIG) घरांची रचना.
विशेष वैशिष्ट्ये:
– घरे रेहॅबिलिटेशनच्या जागांमध्ये नव्याने विकसित केली जात आहेत.
– बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच या घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे.
– प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया.
इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mhada.gov.in) वेळोवेळी माहिती तपासावी.
ठाणे, पालघरसाठी म्हाडाची लॉटरी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण 5,285 सदनिका, तसेच ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
या सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया आज सोमवारी दि. 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता, ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या हस्ते होणार आहे.