Maharashtra Monsoon Session 2025: गोमांससंदर्भात लवकरच कायदा आणणार; 57 किलो गोमांसच्या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न, मंत्र्यांचं उत्तर

Maharashtra Monsoon Session 2025 : लोणावळ्यात मार्चमध्ये 57 हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली.
Maharashtra Monsoon Session 2025 : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्च रोजी दोन संशयित कंटेनर ताब्यात घेतले होते. त्या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस आढळून आले होते. दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. यानंतर त्या कंटेनरमध्ये असलेले मांस हे गोमांस असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन्ही कंटेनरमध्ये मिळून तब्बल 57 हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी विधान परिषदेत भाजप आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी लक्षवेधी मांडली. तर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच यानंतर असा प्रकार समोर आल्यास मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर गोमांससंदर्भात लवकर कायदा आणण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.