ना CV ना डीग्री! ‘ही’ कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगळुरुस्थित एका स्टार्टअप कंपनी स्मॉलेस्ट एआय ने वेगळ्या पद्धतीने रिक्त जागा जाहीर केली आहे.
Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगळुरुस्थित एका स्टार्टअप कंपनी स्मॉलेस्ट एआय ने वेगळ्या पद्धतीने रिक्त जागा जाहीर केली आहे. सहसा कंपन्या भरतीसाठी सीव्ही आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मागतात, परंतु या कंपनीने पदवीशिवाय नोकऱ्या देण्याबद्दलची माहितची दिली आहे. कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामत यांनी ही अनोखी नोकरीची पोस्ट शेअर केली आहे. जी पूर्ण-स्टॅक टेक लीडसाठी आहे. या नोकरीत 60 लाख रुपये निश्चित पगार आणि 40 लाख रुपये कंपनी इक्विटी मिळेल. ही नोकरी बंगळुरूमध्ये पूर्णवेळ ऑफिस जॉब आहे.
सुदर्शन कामत यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की नोकरीसाठी सीव्हीची आवश्यकता नाही, उमेदवाराला फक्त दोन गोष्टी कराव्या लागतात, ज्यामध्ये प्रथम त्याने 100 शब्दांमध्ये त्याचा परिचय लिहावा लागतो आणि दुसरे त्याने आतापर्यंत केलेल्या त्याच्या सर्वोत्तम कामाची लिंक शेअर करावी लागते. यासोबतच, त्यांनी पोस्टमध्ये काही मूलभूत कौशल्यांचाही उल्लेख केला आहे.
व्हायरल पोस्टनुसार, कंपनीला असे उमेदवार हवे आहेत ज्यांना 4 ते 5 वर्षांचा व्यावहारिक अनुभव आहे. Next.js, Python आणि React.js चे चांगले ज्ञान आहे, तसेच एखादा उपक्रम सुरू करण्याचा आणि चांगली वाढ करण्याचा अनुभव आहे.
पोस्ट 60000 हून अधिक लोकांनी पाहिली
दरम्यान, ही पोस्ट 60000 हून अधिक लोकांनी पाहिली आहे. सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे. एका वापरकर्त्याने ट्वीटवर लिहिले आहे की जर तुम्ही 4 ते 5 वर्षांचा अनुभव मागत असाल तर तुम्ही खरोखरच प्रतिभावान लोकांना कामावर ठेवत नाही आहात. यावर सुदर्शनने उत्तर दिले की हा फक्त एक सामान्य नियम आहे. खरी प्रतिभा अनुभवाच्या पलीकडे असते. काही लोकांनी याला एक उत्तम संधी म्हटले, कारण ती कौशल्ये आणि अनुभवावर लक्ष केंद्रित करते.
दरम्यान, ज्या उमेदवारपांकडे कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामत यांनी दिलेली कैशल्ये आहेत, त्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे पगार देखील मोठा मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ना सीव्हीची आवश्यका आहे ना डीग्रीची आवश्यकता आहे. केवळ तुमच्याकडे असणाऱ्या कौशल्याच्या जोरावर तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे.