Mumbai Crime News: मला किकी, पुकी अन् पत्नी म्हणायचा, शिक्षिकेच्या दाव्यानं खळबळ; मुंबईतील विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Mumbai Crime News: जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच शिक्षिकेच्या प्रेमात होता असे पुरावे शिक्षिकेकडून कोर्टात सादर करण्यात आले आहे.
Mumbai Crime News: मुंबईतील दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार (Mumbai Crime News) समोर आला होता. यानंतर संबंधित शिक्षिकेला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.
जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच शिक्षिकेच्या प्रेमात होता असे पुरावे शिक्षिकेकडून कोर्टात सादर करण्यात आले आहे. अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंग कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.
शिक्षिकेने कोर्टात आपल्या अर्जात म्हटले की, ती विद्यार्थ्यासोबत तात्पूरत्या प्रेमसबंधात होती. अल्पवयीन विद्यार्थी तिला पत्नी असे म्हणायचा. किकी आणि पुकी या नावाने शिक्षकेला बोलवायचा असे मेसेज आरोपी शिक्षिकेने कोर्टात सादर केलेले आहेत.
शिक्षिका सध्या अटकेत-
शिक्षिकेने या अल्पवयीन विद्यार्थ्याला वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केलाचा आरोप तिच्यावर आहे. शिक्षिका सध्या अटकेत असून तिच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र आता शिक्षिकेने कोर्टात सादर केलेल्या बाबींमुळे या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आलेला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत काय?
शिक्षिका 40 वर्षांची असल्याचे सांगितले जाते आणि ती विवाहित आहे. तिला एक मूल देखील आहे. तर, पीडित विद्यार्थी 11 वीत शिकत होता आणि तो 16 वर्षांचा होता. तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान एका ती विद्यार्थ्याच्या अनेक वेळा संपर्कात आली. त्यानंतरच ती त्याच्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने पहिल्यांदाच विद्यार्थ्याला नात्यासाठी विचारणा केली. सुरुवातीला विद्यार्थ्याने अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यानंतर, शिक्षकाने शाळेतील तिच्या एका महिला मैत्रिणीची मदत घेतली आणि प्रकरण पुढे नेलं. या प्रकरणी महिला मैत्रिणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पीडित विद्यार्थ्याला सांगितले की ते एकमेकांसाठी बनले आहेत आणि वयस्कर महिला आणि मुलांमधील संबंध सामान्य आहेत. एका मित्राशी बोलल्यानंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, ‘ती (शिक्षिका) विद्यार्थ्याला तिच्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढले आणि त्याचा विनयभंग केला.’ तो म्हणाला, ‘पुढील काही दिवसांत, विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला तिने गोळ्याही दिल्या.’ यानंतर, शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असं तक्रारीत म्हटलं आहे. मात्र आता शिक्षिकेने कोर्टात सादर केलेल्या बाबींमुळे या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आलेला आहे.