महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: शिळं जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारलं, गदारोळ झाल्यानंतरही संजय गायकवाड म्हणतात, ”मी जे केलं ते मला मान्य”

Sanjay Gaikwad on Rada : ऑर्डर आल्यानंतर एक घास खाल्ला आणि जेवण खराब वाटलं. दुसरा घास खाल्ल्यानंतर माझी उलटी झाली. उलटी झाल्यानंतर मी जसा होतो तसाच कँटिनमध्ये गेलो आणि कँटिनमधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली, असंही पुढे गायकवाडांनी म्हटलं आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथील कँटिनमध्ये मारहाण केल्याचा प्रकार काल रात्री (मंगळवारी, ता-8) समोर आला. निकृष्ट जेवण दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर त्यांनी मारहाण आणि एकंदरीत घडलेल्या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे. दिलेलं जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण होतं, त्यानंतरच माझी तेथील कर्मचाऱ्यांवर झालेली ती माझी प्रतिक्रिया होती, असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आकाशवाणीच्या कँटिनमध्ये मी जेवतो आहे. काल(मंगळवारी) रात्री 10 वाजता मी कँटिनमधून रोजच्याप्रमाणे दोन चपाती, डाळ, राइस अशी ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर एक घास खाल्ला आणि जेवण खराब वाटलं. दुसरा घास खाल्ल्यानंतर माझी उलटी झाली. उलटी झाल्यानंतर मी जसा होतो तसाच कँटिनमध्ये गेलो आणि कँटिनमधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली, हे जेवण कोणी दिलं, त्या लोकांना बोलवा असं सांगितलं. तिथे बसलेल्या मॅनेजरलाही देखील दिलेली डाळ दाखवली. कँटिनमध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर माझी तेथील कर्मचाऱ्यांनी देखील ते जेवण खराब असल्याचं बोलले त्यानंतर आलेली ती माझी प्रतिक्रिया होती असंही पुढे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मी जे केलं ते मला मान्य, संजय गायकवाड मारहाणीवर ठाम!

विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात पण मला वाटतं सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जेवतात. सगळ्या जाती-धर्माचे लोक तिथे जेवतात. हा तीस वर्षापासूनचा कंत्राटदार त्या ठिकाणचा आहे. त्यांचे किचन अतिशय घाण आहे, त्यांच्या किचनमध्ये उंदीर फिरतात त्यांनी आम्हाला जेवण चक्क सडलेलं दिलं होतं. त्यांनी आम्हाला निकृष्ट दर्जाचा नाही तर सडलेलं अन्न दिलं होतं. मी त्याला जेवणाची ऑर्डर दिली होती. दोन चपाती भात डाळ जेवण आणल्यानंतर एक घास खाल्ल्यानंतर मला ते सडलेलं जाणवलं. दुसऱ्या घासाला मला उलटी झाली. ते जेवण घेऊन मी कॅन्टीनमध्ये गेलो. तेथील कामगारांना मी अन्नाचा वास दिला तो म्हणाले घाण वास आहे. मी एकाला नाही तर इथल्या दहा लोकांना ते दाखवलं. त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं. जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून सांगितले. तरी त्याला समजत नसेल तर मी त्याला माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं आणि मला त्याचा काहीही पश्चाताप झालेला नाहीये. विरोधी पक्ष माझ्या बाबतीत काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. याप्रकरणी सोशल मीडिया लोक प्रतिक्रिया देत आहेत, सगळेजण त्या जेवनाबद्दलचा आपला आपला अनुभव शेअर करत आहेत. आमदार देखील सांगत आहेत. अधिकारी सांगत आहेत. अनेक लोकांचे मला फोन येत आहेत, असंही पुढे संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button