Devendra Fadnavis on MNS Mira bhayandar Morcha: अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी, मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

MNS Mira bhayandar Morcha: मोर्चाला परवानगी नाकारलेय, कलम 144 लागू, एकत्र जमू नका; मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची फायनल वॉर्निंग. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
MNS Marathi Morcha in Mira bhayandar: पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. मनसे आणि पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसेचे (MNS) नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल, असा रुट मागत होते. पण पोलीस त्यांना नेहमीचा रुट घ्या, असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार देत आम्ही आमच्याच मार्गाने जाणार अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मंगळवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात मनसेच काय इतर कोणलाही मोर्चा काढायला परवानगी आहे. पण मोर्चा इथेच काढायचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर ते योग्य ठरणार नाही. आपल्याला इथे एकत्रित राहायचे आहे, राज्याचा विकास करायचा आहे. योग्य रुटने मोर्चा काढला असता तर मोर्चाला परवानगी मिळाली असती. ती परवानगी आजही मिळेल, उद्याही मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Devendra Fadnavis: अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी का दिली?
मिरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी काढलेल्या अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. मी पोलिसांना विचारलं त्याच्यावर सीपींनी मला सांगितलं की, जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठल्याही रुटचा आग्रह केला नव्हता. मनसेने स्पेसिफिक अशा रुटचा आग्रह केला. जिथे मोर्चा काढणं कठीण आहे, असा रुट मागण्यात आला. काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे, त्याची परवानगी त्यांना दिली होती, असे फडणवीसांनी सांगितले.
तुम्ही सभा घ्या पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला असता. आता इतके वर्षे आपण सगळेच मोर्चे काढतोय. मोर्चे काढत असताना आपण पोलिसांची चर्चा करून रूट ठरवत असतो. आता ज्यावेळेस 5 तारखेचा मोर्चा या दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रुट ठरला होता. मोर्चा काढायला कोणालाही ना नाहीये, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणे कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे. आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती मीरा-भाईंदरचा रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रोड बदला. पण ते मोर्चाचा रोड बदलायला तयार नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.