महाराष्ट्र

Sushil kedia: मराठीत प्रश्न विचारताच केडिया चर्चेतून पळाला;राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?

सुशील केडिया यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हिंदीत संवाद साधण्याची मागणी केली होती. त्यानुसार, एबीपी माझावर हिंदी, मराठी असा संवाद सुरू असताना सुशील केडियाने चर्चेतून पळ काढला

मुंबई : मराठी विषयाच्या मुद्द्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांचा उद्या मुंबईत एकत्रित मेळावा पार पडत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असून संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्त्यांनी या मेळाव्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भायंदर येथे एका स्वीट मार्ट मालकाला मारहाण केल्याने वाद निर्माण झाला असून व्यापाऱ्यांनी एकत्र येत मनसेच्या (MNS) दडपशाहीला विरोध दर्शवला आहे. तर, दुसरीकडे शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी ट्विट करुन राज ठाकरेंना डिवचलं होतं. मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी (Marathi) येत नाही, बोल क्या करना है, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर, एबीपी माझावर आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या केडिया यांनी मराठीत प्रश्न विचारताच पळ काढला.

सुशील केडिया यांनी आपली बाजू मांडण्यासाठी हिंदीत संवाद साधण्याची मागणी केली होती. त्यानुसार, एबीपी माझावर हिंदी, मराठी असा संवाद सुरू असताना सुशील केडियाने चर्चेतून पळ काढला. तुम्ही माझी फसवणूक केली आहे, मी केवळ हिंदी किंवा इंग्रजीत चर्चा होणार असेल तर सहभागी होणार होते, असे म्हणत त्यांनी आपला कॅमेरा बंद केल्याचं पाहायला मिळत आहे.

सुशील केडिया कोण?

सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. सेबी (SEBI) नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार अशी त्यांची फर्म आहे. शेअर बाजारातील अनुभवामुळे ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक म्हणून भूमिका बजावतात, बाजू मांडतात. केडिया यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये काम केले आहे. सुशील केडिया यांच्याकडे असलेल्या 45 कंपन्यांमधील शेअर्सचे जून 2025 पर्यंतचे एकूण मूल्य 3,103 कोटींहून अधिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button