महाराष्ट्र

Neelam Gorhe on Thackeray: ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका, मनसे नेते संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख

Neelam Gorhe on Thackeray: नीलम गोऱ्हे यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून बोलताना ठाकरे ब्रँडवरून सडकून टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही फुटकळ असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.

Neelam Gorhe on Thackeray: राज्यात हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी महायुती सरकारला दोन्ही जीआर रद्द करण्यास भाग पडल्यानंतर त्याचा विजयी मोळ मेळावा उद्या (5 जुलै) मुंबईमध्ये होत आहे. या मेळाव्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता असून शिवसेना आणि मनसेकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू मराठीवरून कोणता संदेश देणार आणि भविष्यात एकत्र येणार का? याची सुद्धा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्येच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याचा मेळावा उत्सुकता वाढवणारा आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड कधी संपला जाणार नाही हे सुद्धा ठाकरे बंधूंनी काही दिवसांपूर्वी सूचित केलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली आहे.

ब्रँड हा बाजारातील उत्पादनाला वापरतो

नीलम गोऱ्हे यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून बोलताना ठाकरे ब्रँडवरून सडकून टीका केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही फुटकळ असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की लोकशाहीमध्ये मेळावे घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. राज्य सरकारने जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसेच समिती नियुक्त करण्यात आली आहे. समिती काय करणार हे विचारात न घेता विरोध करून चुकीच असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. मराठी जणांना लक्षात घेऊन मेळा होत आहे असं मी गृहीत धरते असे त्या म्हणाल्या.  ब्रँड हा बाजारातील उत्पादनाला वापरतो, काही प्रश्नांची उत्तरं काळ देईल असंही त्या म्हणाल्या.  त्या पुढे म्हणाल्या की, विधानसभेमध्ये साठ आमदार निवडून आणून शिंदे साहेबांनी आपली प्रतिमा वंचावली.

काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही 

काही ठिकाणी मराठी भाषा बोलता येत नाही असं म्हणणारे आहेत. मात्र ठाम भूमिकेने त्यांच्यासाठी संघर्ष करावा. काही फुटकळ लोकांची दखल घेतली पाहिजे हे काही गरजेच नसल्याचे म्हणत त्यांनी संदेश देशपांडे यांच्यावर खोचक टीका केली. दरम्यान मराठीवर बोलताना त्या म्हणाल्या की मराठी देशाचे नेतृत्व केलं आहे. दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये मराठी व्यावसायिकांनी एकत्र येत काढलेल्या मोर्चाला भाजपकडूनच रसद पुरवण्यात आली आहे अशी टीका मनसे नेते अविनाश  जाधव यांनी केली आहे. या टीकेवर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की मीरा भाईंदरमध्ये रसद पुरवण्याचे काम कोण करत आहे पहिल्यांदा पहिले पाहिजे. राजकारण आपल्या भल्याचं नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button