महाराष्ट्र

Malegaon Karkhana Election: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी गद्दारी झाली, क्रॉस व्होटिंगने उमेदवारांची धाकधूक वाढली, कोणाला बसणार फटका?

Malegaon Karkhana Election: आतापर्यंतच्या मतमोजणीकडे पाहता मुख्य लढत अजित पवारांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव पॅनेलमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

बारामती: राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळीपासून सुरु झाली आहे. पहिला निकाल जाहीर झाला आहे. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांना 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत. तर या निवडणुकीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे. पॅनेल टू पॅनल मतदान झालं नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीकडे पाहता मुख्य लढत अजित पवारांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव पॅनेलमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या मतमोजणीत आतापर्यंतच्या आढाव्यानुसार क्रॉस व्होटींग झाल्याचं पहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: जरी ब गटातून निवडून आले असले तरी इतर गटांमधे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवारांकडून कडवी लढत पहायला मिळतेय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक प्रतिष्ठेची करताना पॅनेल टु पॅनेल मतदान करुन त्यांच्या संपूर्ण पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. मात्र मतदारांनी अजित पवारांच्या पॅनेल बरोबरच तावरेंच्या पॅनेलला देखील मतदान केल्याच प्रथमदर्शनी पहायला मिळतंय.

क्रॉस व्होटिंगचा फटका कुणाला बसणार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ब वर्ग गटातून विजयी झाले असले तरी बाकी उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याचं चित्र आहे. माळेगाव, सांगवी, पणदरे गटात क्रॉस व्होटिंग झालं आहे. मत पत्रिका छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु छाननीमधून जो कल मिळतोय तो क्रॉस व्होटिंग झाल्याचा असल्याचं दिसून येतं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पॅनेल टू पॅनल मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आता या निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. क्रॉस व्होटिंगचा फटका कुणाला बसणार याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.

अजितदादांचा पहिला दणदणीत विजय

या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) बाजी मारली आहे. अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत होत असल्याचं चित्र आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन येथे मतमोजणी सुरु आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती.

निवडणूक लढवणाऱ्या नव्वद उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल अशी चार पॅनेल्स मैदानात आहेत. पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे. ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुरवातीपासून आघाडीवर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button