महाराष्ट्र

Sharad Pawar: बारामतीतील PDCC बँक रात्री उघडल्याच्या प्रकरणावर शरद पवारांचं भाष्य, म्हणाले,’रात्री 12 वाजता लोकांची कशाची सेवा…’

Sharad Pawar: बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे.

बारामती: राज्यभरात सध्या चर्चेत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले. बारामतीतील (Baramati) राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी (PDCC Bank) बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला होता. याच बँकेत (PDCC Bank) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला होता. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक (PDCC Bank) का उघडी ठेवण्यात आली असा सवाल सहकार बचाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता, या घटनेवरती आज माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

सूचना असल्याशिवाय कर्मचारी बॅंक कशाला उघडेल

लोकसभा निवडणुक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बॅंकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बॅंक कशी उघडी होती. बॅंकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बॅंक कशाला उघडेल. रात्री 12 वाजता लोकांची कशाची सेवा केली जाते ते आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.

नेमकं काय प्रकरण?

बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली होती याबाबत सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले होते. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबतचा जाब या ठिकाणी विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्याठिकाणी होते, असा दावा रंजन तावरेंनी केला आहे. पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button