MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 14 विद्यार्थ्यांना 100 पर्टेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. MHT CET 2025 (PCM गट) चा निकाल आज, म्हणजेच 16 जून रोजी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला आहे
मुंबई : विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता लागलेल्या यूजी NEET (नीट) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता एमएचटी सीईटी पीसीएम (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. तर, एमएचटी-सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल (Results) उद्या जाहीर होणार आहे. त्यामुळे, आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर आंनदोत्सव साजरा केला आहे.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. MHT CET 2025 (PCM गट) चा निकाल आज, म्हणजेच 16 जून रोजी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 22 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) गटातून परीक्षा दिली होती, त्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल आहे. तर, PCB गट (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) चा निकाल उद्या म्हणजेच 17 जून रोजी जाहीर केला जाईल. PCM गटाची परीक्षा 19 एप्रिल ते 5 मे 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या गटात 4,64,263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 4,22,863 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले होते. त्यामध्ये, 22 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.