Kolhapur News : शक्तिपीठ महामार्गाचा सर्व्हे बंद, महावितरणच्या कर्मचाऱ्यांची अडवणूक, कोल्हापुरातील संतप्त शेतकऱ्यांचा सज्जड इशारा

Shaktipeeth Highway Project :समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शक्तिपीठ आणि धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गामुळे महायुतीला जोरदार फटका बसला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने शांततेची भूमिका घेत शक्तिपीठ महामार्ग तात्पुरता स्थगित केला. मात्र निवडणुका होताच आणि महायुतीचे सरकार येतात पुन्हा हा महामार्ग करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू झालाय.
नयन यादवाड, कोल्हापूर: जिल्ह्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील सरकारचा महत्वकांशी प्रकल्प असलेला शक्तिपीठ महामार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शक्तिपीठ महामार्गामध्ये अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब हटवण्यासाठी महावितरणने सर्व्हे सुरू केलाय. रविवारी करवीर तालुक्यातील खेबवडे येथून व्हनाळी, केनवडेपर्यंत खांबांचा सर्व्हे करणाऱ्यास आलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना केनवडे येथे पकडून शेतकऱ्यांनी जाब विचारत सर्व्हे बंद पाडला आहे. यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यामधील संघर्ष आणखी वाढणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शक्तिपीठ आणि धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गामुळे महायुतीला जोरदार फटका बसला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने शांततेची भूमिका घेत शक्तिपीठ महामार्ग तात्पुरता स्थगित केला. मात्र निवडणुका होताच आणि महायुतीचे सरकार येतात पुन्हा हा महामार्ग करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू झालाय. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होता. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही असा अध्यादेश मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर सभेत दाखवलं होतं.




