महाराष्ट्र
आज कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी व पूरबाधित नागरिकांनी अंकली या ठिकाणी एकत्र येऊन तीव्र आंदोलन केले, या आंदोलनात हजारो नागरिकांसह शेतकरी व्यापारी महिला भगिनींनी सहभाग घेतला अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका अधिकच वाढू शकतो यामुळे हजारो शेतकरी व नागरिकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते या भागातील नद्यांचा प्रवाह व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतल्यास अतिशय धोकादायक आहे.

यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतदादा पाटील, भाजपा कोल्हापूर पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील- किणीकर, मा.आमदार प्रकाश आवाडे, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम पाटील आणि माजी चेअरमन रजनीताई मगदूम आमदार राहूल आवाडे, आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन केले व आंदोलनाला पाठबळ दिले.