महाराष्ट्र

Sanjay Raut : भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवायची संधी होती पण राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut on India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत आक्षेप घेत, ट्रम्प यांचा मध्यस्थीचा काय संबंध? असा सवाल उपस्थित केलाय. तर भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवायची संधी होती पण राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प हे कोणत्या अधिकारात मध्यस्थी करत आहेत? भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. 140 कोटी लोकसंख्येचे महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो, कोणत्या आधारावर? कोणत्या अटी-शर्तीमुळे? भारताला काय मिळाले? युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भाजपने जाहिरात केली होती की पापाने वॉर रुकवा दिया. मग आता अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया क्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुरा बदला लेंगे ही भाषा होती. छोडेंगे नही पाकिस्तान को, तुकडे करेंगे, कुठे केले तुकडे? भारताची बेअब्रू झाली आहे. जगभरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आलं की, आम्ही युद्ध जिंकलं. भारतासारख्या देशाला आणि देशाच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही. कुठे गेले सगळे अंधभक्त? कोणत्या अटी-शर्तीवर तुम्ही ही युद्धबंदी केली? यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला पाहिजे. त्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली

संजय राऊत पुढे म्हणाले की, युद्धबंदीची खरच गरज होती का? लाहोर ताब्यात आलं, कराची ताब्यात आलं, इस्लामाबादमध्ये बॉम्ब टाकले, मग माघार घ्यायची गरज काय? पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवायची संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेले असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली. देशाचं आणि सैन्याचा मनोबल उद्ध्वस्त केलं, असे त्यांनी म्हटले.

इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलंच नसतं

आज लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते. त्यांनी 1971 साली अमेरिकेच्या प्रेसिडेंटला सांगितलं होतं, तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आम्ही पाकिस्तानबरोबर युद्ध करणार आहोत. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले.  नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदी यांनी देशातसोबत विश्वासघात केला आहे.  अमित शाह गृहमंत्री असताना अजूनही अतिरेकी सापडले नाही, त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. मोहन भागवत यांनी प्रवचन देऊ नये, ते राष्ट्रभक्त असतील तर सगळ्यात अगोदर त्यांनी राजीनामा मागावा. इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलंच नसतं. 1971 साली पाकिस्तानचे सैन्य गुडघे टेकलेले आम्ही पाहिलेले आहे. हे काय करत आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्यावरती हे फक्त घाणेरडे भाषण करतात. त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची तुमची लायकी नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button