महाराष्ट्र ग्रामीण

Sangli News : सांगलीत दिवसाढवळ्या तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूम स्टाईलने लांबवली; चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Sangli News : सांगलीतील ध्यानचंद्र सगळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले 40 तोळे सोने लग्नकार्यासाठी काढले होते.

Thief steals 40 tolas of gold in broad daylight in Sangli : सांगली शहरातील वर्दळ असलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या एका व्यक्तीची तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूमस्टाईल लांबविल्याची घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने सांगलीत खळबळ उडाली आहे. चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

लॉकरला ठेवलेले 40 तोळे सोने लग्नकार्यासाठी काढले होते

सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र सगळे यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले 40 तोळे सोने लग्नकार्यासाठी काढले होते. दोन दिवसांपूर्वी लग्न समारंभ आटोपल्यानंतर आज सकाळी साहे दहा वाजता ध्यानचंद्र सकळे हे त्यांच्या कारमधून एका कारचालकासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरला ठेवण्यासाठी आले होते.

हातातील पिशवीला हिसडा मारून पोबारा केला

ध्यानचंद्र सगळे हे त्यांच्या कारमधून उतरताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवीला हिसडा मारून पोबारा केला. कोणाला काही समजण्यापूर्वीच चोरट्याने बॅग घेऊन पोबारा केला. हातात बॅग हातोहाता लंपास झाल्याने सगळे यांना सुद्धा धक्का बसला. त्यांनी ओरडल्यानंतर जमाव जमला. मात्र, तोपर्यंत चोरट्याने बॅगेसह पोबारा केला होता. यानंतर मात्र सांगलीत एकच खळबळ उडाली. माहितगार व्यक्तीकडून ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. स्थानिक गुन्हे शाखेची आणि विश्रामबाग पोलिसांची पथके चोरट्याच्या मागावर रवाना करण्यात आलेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button