महाराष्ट्र ग्रामीण
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीचा दहावीचा निकाल, आईने टक्केवारी सांगितली, दिवीजाला किती गुण मिळाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे आपल्या लेकीच्या 10 वीच्या परीक्षेसाठी गेल्या 5 महिन्यांपासून मुख्यमंत्री हे जुन्याच घरी म्हणजे सागर बंगल्यावर राहत होते.
मुलीची परीक्षा असल्या कारणाने मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही. शिवाय तिथे थोडं डागडुचीचं कामही बाकी आहे. त्यामुळे, लेकीच्या परीक्षेनंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
देवेंद्र फडणवीसांनी आज अक्षय्या तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांच्या लेकीचा 10 वीच्या परीक्षेचा निकालही आला.
दिविजा हिस 10 वीच्या इंटरनॅशनल बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळाले आहेत. अमृता फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली. तसेच, आम्हाला आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवीजा ही मुंबईतील फोर्टस्थित कैथेड्रल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. यंदाच्या वर्षी तिने दहावी बोर्डची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला 92.60 टक्के गुण मिळाले असून तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.