Solapur News : सोलापुरात मोठी घडामोड, संजयमामा शिंदेंच्या महायुती पॅनलचा धुव्वा, पवार गटाची सरशी

Solapur News : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलचा धु्व्वा उडाला आहे.
सोलापूर: संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलचा धु्व्वा उडाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या संजयमामा शिंदे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. तर विद्यमान आमदार नारायण पाटील भटक्या विमुक्त जाती जमाती
काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या शिलेदाराने भाजप आमदाराच्या पॅनलचा धुव्वा उडवला. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री आणि शरद पवारांचे शिलेदार असलेले माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या दोघांच्याही पॅनलचा धुव्वा उडवला. त्.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या जागेसाठी 62 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु करण्यात आली. सुरुवातीस संस्था प्रतिनिधी गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच ऊस उत्पादक गटातील मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर महिला प्रतिनिधीसह सर्व राखीव गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गटाची एकहाती सत्ता आली आहे. तर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील 21 पैकी 21 जागांवर विजय मिळविल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करमाळा तालुक्यात जल्लोष करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 6 महिन्यात दोन महत्त्वाच्या मोठ्या कारखान्यात शरद पवार गटाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. या निवडणुकीत प्रा. रामदास झोळ या तिसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना दीड हजाराच्या वरही मतदान मिळवता आलेले नाही.