महाराष्ट्र

मोठी बातमी : अखेर भाजप आणि काँग्रेसची युती झालीच, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने इतिहास रचला

Maharashtra Politics : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या नेतृत्वात एक पॅनल करण्यात आलाय.

Maharashtra Politics : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Market Committee Election) निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आलाय. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलं आहे. पण माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ही तत्कालीन पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी दिला पाठिंबा होता. तर आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

सचिन कल्याण शेट्टी काय काय म्हणाले?

‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वखाली ही निवडणूक लढवतोय, यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणचा विषय नाही’ दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय”, असं भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते दिलीप माने यांची प्रतिक्रिया 

मुख्यमंत्र्यांनी सचिनदादांना सूचना केल्या होत्या त्यांनी आम्हाला आवाहन केलं त्या आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केलाय. बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकारच्या बाबतीत मी स्वतंत्र निर्णय घेत असतो, मी स्वयंभू आहे, असं काँग्रेस नेते दिलीप माने यांनी स्पष्ट केलंय..

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा (Solapur Market Committee Election)

भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button