Uncategorized

शिरोळ तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

शिरोळ तालुक्यातील ‌52 ग्रामपंचायतच्या सन 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी जाहीर केले यामध्ये 52 ग्रामपंचायती पैकी 26 महिला 26 पुरुष सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेआगामी पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचे आरक्षण गृहीत धरून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू ठेवली होती मात्र आरक्षणातील संधी खोकल्याने बऱ्याच इच्छुकांची नाराजी दिसून येत आहे आरक्षण नंतर बहुतांश गावातील सरपंच पदासाठी इच्छुक असणार असणाऱ्या मध्ये काही खुशी काही गम असे वातावरण पाहायला मिळाले
शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली यावेळी तालुक्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते सुरुवातीला तहसीलदार अनिल कुमार केळकर यांनी आरक्षण पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली प्रारंभी अनुसूचित जाती आरक्षण सोडत झाली यामध्ये 1995 पासून आज अखेर अनुसूचित जातीसाठी बुबनाळ अब्दुल लाट अर्जुनवाड अकिवाट शिरटी गावासाठी तसेच अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी राजापूर वाडी शिवनाकवाडी लाटवाडी उदगाव टाकवडे ही गावे आरक्षित करण्यात आली अनुसूचित जमातीसाठी 1995 पासून आरक्षण न पडल्याने मौजे आगर टाकळीवाडी या दोन गावांपैकी अनुसूचित जमाती महिला सरपंच पदासाठी मौजे आगर हे गाव चिट्टी द्वारे काढण्यात आली त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग आरक्षण हेरवाड जैनापुर उमळवाड तेरवाड राजापूर घालवाड जुने तनवाढ तर ना.मा.प्र. महिलांमध्ये दत्तवाड औरवाड नवेदानवाड यड्राव बस्त वाडा आलास संभाजीपुर ही गावी आरक्षित करण्यात आली
त्याचबरोबर खुला सर्वसाधारण प्रवर्ग महिलांमध्ये कवठेसार कोथळी कुटवाड नांदणी शिरढोण शेडशाळ गणेश वाडी कोंडीग्रे हरोली शरदवाड जांभळी नरसी वाडी खिद्रापूर तर सर्वसाधारण मध्ये चिंचवड कनवाड तंबलगे हसुर धर्मगुत्ती कवठेगुलद घोसरवाड दानोळी निमशिरगाव चिपरी मजरेवाडी गौरवाड टाकळी या गावाचा आरक्षण साठी सामावस आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button