प्रशांत कोरटकरचा जामीन फेटाळला, तुरुंगातील मुक्काम वाढला; वकिलांच्या जोरदार युक्तीवादानंतर कोर्टाचा आदेश

प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, सरकारी अन् फियार्दी वकिलांच्या जोरदार युक्तीवादानंतर कोर्टाचा निर्वाळा
कोल्हापूर: इतिहास अभ्यासक इंग्रजीत सावंत यांना धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा (Prashant Koratkar) कारागृहातील मुक्काम आणखी वाढलाय .कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे .सरकारी वकील आणि फिर्यादींच्या वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद आजच्या सुनावणीत केला असून प्रशांत कोरटकर आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे .न्यायालयाने गेल्या (दि. 30) सुनावणीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची सध्या परवानगी करण्यात आली होती. यानंतर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली असून दोन्ही बाजूनी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद आल्यानंतर आता जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
सुनावणीत सरकारी वकील अन् फिर्यादी वकिलांचा जोरदार युक्तीवाद
छत्रपती शिवाजी महारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत आलेल्या प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज केला होता. त्यावर आज कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयात सुनावणी आज संपली. कोर्टाने कोरटकरच्या जामीन अर्जाला फेटाळलं असून प्रशांत कोरटकर कोल्हापूर सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. दरम्यान , आज न्यायालयात सरकारी वकील आणि फियार्दी वकिलांचा जोरदार युक्तीवाद झाला. प्रशांत कोरटकर हा शिवभक्त होता, त्याच्या हातून गुन्हा घडायच्या आधी शिवजयंतीला त्याने रायगडला जाऊन महाराजांना अभिवादन केल्याचे पुरावे आहेत असा युक्तिवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला. तर या प्रकरणात तपास करण्यासारखं काहीच नसून प्रशांत कोरटकरला जामीन दिला तर तो पुन्हा पळून जाईल. आरोपीला समाजात तेढ निर्माण करायची आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपीला मराठा आणि ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करायचा आहे. तक्रारदार हे इतिहास संशोधक आहेत. आरोपीने सुरुवातीला मी कॉल केला नाही असं म्हटलं. मात्र हा तांत्रिक बाबीचा आधार घेण्याचा अपयश ठरलेला हा प्रयत्न आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात कोरटकर याने त्याच्याच मोबाईलवरून फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मोबाईल हॅक झाला हा आरोपीचा दावा खोटा ठरतो.
जामीन अर्ज फेटाळला, जेलमधला मुक्काम वाढणार
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकरची पोलिस कोठडी रविवारी संपली. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिसीद्वारे 30 एप्रिलला सुनावणी झाली. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला कळंबा कारागृहाच्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं असून जामीन अर्ज फेटाळल्याने आता प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम आणखी वाढणार आहे.