महाराष्ट्र

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंवर मानहानीचा गुन्हा दाखल; प्रशांत कोरटकर प्रकारणी मुख्यमंत्र्यावरील टीकेवरुन भाजप आक्रमक

Nagpur News : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात केलेल्या आरोपांवरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.

Nagpur News : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात केलेल्या आरोपांवरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. अतुल लोंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बोलताना प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का? असा प्रश्न उपस्थित करत भाजप ने खुलासा करावा, अशी मागणी केली होती. याच आरोपावर नागपुरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती.

दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना महागात पडले आहे. या प्रकरणी अतुल लोंढेंवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोप बिनबुडाचे आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे- बंटी कुकडे

प्रशांत कोरटकरसोबत तोलंगाणातून अटक केलेला प्रतिक पडवेकर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहे,  मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आणि शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या वतीने  गणेशपेठ पोलीसठाण्यात अतुल लोंढेच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा भाजपच्या शिष्टमंडळाने गणेश पेठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल होत अतुल लोंढे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे आहेत, असा आरोप केला. यावेळी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे प्रवीण दटके ही उपस्थित होते.

कोरटकरचा मित्र धीरज चौधरीची गाडी कोल्हापूर पोलिसांनी जप्त

प्रशांत कोरटकरचा मित्र धीरज चौधरीची गाडी कोल्हापूर पोलिसांनी जप्त करून आणली आहे. काल (28 मार्च ) कोर्टामध्ये युक्तिवादाच्या दरम्यान धीरज चौधरी यांनी गाडी पुरवली याची माहिती समोर आली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांची टीम चंद्रपूरला रवाना झाली आणि त्यांनी प्रशांत कोरटकरने वापरलेली गाडी जप्त करण्यात आली. ही गाडी ज्या ठिकाणी लावली होती, त्याची कुणकुण माध्यमांना लागताच आता पोलिसांनी ती गाडी अज्ञात ठिकाणी हलवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button