महाराष्ट्र

Dhananjay Munde-Karuna Sharma: धनंजय मुंडेंनी करुणासोबत अधिकृत लग्न केलंच नाही, वकिलाचा युक्तिवाद; न्यायाधीश म्हणाले, मग मुलं कोणाची?

Dhananjay Munde-Karuna Sharma: धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद आज करण्यात आला.

Dhananjay Munde-Karuna Sharma मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा शर्मा (Karuna Sharma) (मुंडे) यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (29 मार्च 2025)  माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मासोबत झालेला लग्न हे अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. यानंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत?, असा सवाल न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकीलाला विचारण्यात आला. यावर हे सगळे पुरावे आम्ही सादर करू…आम्हाला वेळ हवा आहे, असं करुणा शर्माच्या वकीलांनी सांगितले. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असा न्यायालयाने सांगितले आणि पुढील सुनावणी 5 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

माझगाव  सत्र न्यायालयात काय काय घडलं?

धनंजय मुंडे यांच्या वकिलाचा युक्तिवाद-

– धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही- धनंजय मुंडे यांचे वकील 

– मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत? -न्यायाधीशीचा धनंजय मुंडे यांचा वकीलाला सवाल 

– धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारलं आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही- धनंजय मुंडे वकील 

– मुलं तुमची आहे म्हणता मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत, कोर्टकडून विचारणा 

– 15 लाखच्या जवळपास वर्षाला इन्कम करुणा शर्मा यांचा आहे, त्या इन्कमटॅक्स भरतात… त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला

– दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वीकारल आहे त्यांना नावं दिला आहे, करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालावला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होतं नाही.. पती पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि अधिकृत लग्नही झाले नव्हते…

– धनंजय मुंडे यांचा एक लग्न झालेला आहे त्यामुळे दुसरं लग्न त्यांनी केलेला नाही, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे संबंध परस्पर संमतीने होते हे कुठेही लपवले नाही. फक्त धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालेलं नाही – धनंजय मुंडेंच्या वकीलांचा युक्तिवाद 

करुणा शर्मा आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, त्यांनी निवडणूकसुद्धा लढवली

करुणा शर्माच्या वकीलांनी कोणता युक्तिवाद केला?

– धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा शर्मा यांचे लग्न 1998 ला झाला आहे, या लग्नानंतर त्यांना अपत्य आहेत, त्यांचे एकत्र फोटो आहेत…करुणा मुंडे यांच्या वकिलाकडून युक्तीवाद

– करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत?  न्यायालयाचा करुणा शर्मा यांच्या वकिलाला सवाल 

– हे सगळे पुरावे आम्ही सादर करू…आम्हाला वेळ हवा आहे, असं करुणा शर्माच्या वकीलांनी सांगितले. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असा न्यायालयाने सांगितले आणि पुढील सुनावणी 5 एप्रिलला ठेवण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button