महाराष्ट्र

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?

ठाणे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी ठाणेकरांसाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध केल्या होत्या. शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता.

बीड : जिल्ह्यातील शिरुर कासार येथील मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतिश उर्फ खोक्या (Beed) भोसलेचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून खोक्याचे प्रकरणं समोर आल्यानंतर वन विभाग आणि बीड पोलीसही खोक्याचा शोध घेत होते. अखेर, खोक्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आली असून लवकरच त्याला बीडमध्ये हजर केले जाणार आहे. मात्र, खोक्या बीडमध्ये येण्यापूर्वीच त्याच्यावरील तडीपारीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी (police) त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे. त्यामुळे, आता खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्‍चित झाली आहे. मागच्या आठवडाभरापासून विविध कारणाम्यांनी चर्चेत आलेल्या आणि भाजप आमदार सुरेश धस यांना टिकेचा धनी बनवणारा सतीश भोसले उर्फ खोक्याला हा मोठा धक्का बसला आहे.

एका व्यक्तीला बॅटने मारहाण, वाहनांत नोटांचे बंडलची ठेवाठेव, तसेच सोफ्यावर बसून नोटांचे बंडल जुळवण्यासह शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा करणारे सतीश भोसले उर्फ खोक्याचे व्हिडीओ समोर आले होते. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहेबाजूने टिका झाली. अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. वन विभागाच्या छाप्यात त्याच्या घरी शिकारीचे साहित्य आणि गांजा आढळल्याने हा देखील गुन्हा नोंद झाला. त्याच्या अटकेसाठी शिरुर बंद करुन मोर्चाही काढण्यात आला होता. सहा दिवसांपासून फरार असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांत जिल्ह्यात आणून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच त्याला आणखी एक धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button