महाराष्ट्र

Raj Thackeray And Uddhav Thackeray Meets Matoshree: ठाकरे बंधू आज पुन्हा भेटले, राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

Raj Thackeray And Uddhav Thackeray Meets Matoshree: मनसेप्रमुख राज ठाकरे आज सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले आहेत. ठाकरे बंधू सहकुटुंब मोतश्री निवासस्थानी भोजन करणार आहेत.

Raj Thackeray And Uddhav Thackeray Meets Matoshree मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज (12 ऑक्टोबर) सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले आहेत. आज ठाकरे बंधू सहकुटुंब मोतश्री निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत. मागील वेळेस मागील वेळेस उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवास्थानी राज ठाकरे यांना भेटण्यास गेले होते, मात्र ते एकटेच होते. मात्र आज राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्रीवर दाखल (Raj Thackeray And Uddhav Thackeray Meets Matoshri) झाले आहेत. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखीन दृढता वाढत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी मनसे-ठाकरे सेना युतीच्या चर्चा सुरू आहेत. मागील अनेक वर्ष दुरावा असलेल्या बंधूंमध्ये जवळीक वाढून थेट युतीचा चर्चा सुरू आहेत.

ठाकरे बंधू कधी कधी एकत्र पाहायला मिळाले? (Raj Thackeray-Uddhav Thackeray Meets)

1. 5 जुलै 2025 ला मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले.

2. 27 जुलै 2025  मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली आणि थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले.

3. 27 ऑगस्ट 2025 या भेटीच्या चर्चा राजकारणात तग धरून होत्याच आणि तब्बल दोन दशकानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरच्या गणेशोत्सवाचे निमित्त घेऊन शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थिती दाखवली. 

4. 10 सप्टेंबर 2025 गणेश मुहर्त हा भेटी चे निमित्त ठरला पण गप्पा मात्र अपुऱ्या झाल्या आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले.

5. 5 ऑक्टोंबर 2025, 5 जुलैला एकत्र आलेल ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीत युती करून सामोरे जाणार का?, या चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेत पुन्हा तीन महिन्यात पाचव्यांदा ठाकरे बंधू आज ठाकरेंच्या शिवसेनेंचे खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र सहकुटुंब पाहायला मिळाले.

6. 12 ऑक्टोंबर 2025 – राज ठाकरे आईला घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्नेह भोजनाचा मातोश्री येथे कार्यक्रम

ठाकरे बंधूंची 3 महिन्यात 5 वेळा भेट (Shivsena UBT MNS Alliance)

5 जुलै 2025 ला मराठी भाषेच्या मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यानंतर, 27 जुलै 2025 रोजी मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली आणि थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले होते. तर, 27 ऑगस्ट 2025 या भेटीच्या चर्चा राजकारणात तग धरून होत्याच आणि तब्बल 2 दशकानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरच्या गणेशोत्सवाचे निमित्त घेऊन शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थिती दाखवली. तसेच 10 सप्टेंबर रोजी गणेश मुहर्त ह्या भेटीचे निमित्त ठरला पण गप्पा मात्र अपुऱ्या झाल्य आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर 5 ऑक्टोंबर रोजी ते संजय राऊत यांच्या कौटुंबीक कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत. 5 जुलै रोजी पुन्हा एकत्र आलेल ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीत युती करून सामोरे जाणार का? या चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेत पुन्हा तीन महिन्यात पाचव्यांदा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button