महाराष्ट्र

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : तेव्हा तुम्ही शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का? नाराजीवरून राऊतांनी भुजबळांना डिवचलं!

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी छगन भुजबळांना डिवचलंय.

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील वातावरण चांगलेच तापले होते. मनोज जरांगे पाटील ठरल्याप्रमाणे मुंबईत दाखल झाले आणि आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) उपोषणाबाबत नाराजी व्यक्त करत मैदान रिकामं करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी, राज्य सरकारकडून जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेण्यात आली आणि त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यांनी सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील भुजबळांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की, छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात घेतलं आहे. मोदींनी सांगून त्यांना मत्रिमंडळात घेतलं आहे.  भुजबळ हे ओबीसी असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. ही मोदींची कृपा आहे की भुजबळ मंत्रिमंडळात आहेत. मग ते मोदींना बोलतील, ओबीसींचे मतं मांडतील. मोदी स्वतः ओबीसी नेते आहेत, असे ते अनेकदा म्हणतात. भुजबळ नाराज आहेत की नाहीत त्यापेक्षा ते मंत्रिमंडळात आहेत.

आता तुम्ही मंत्रिमंडळ सोडणार का?

जर भुजबळ यांना वाटत असेल समाजावर अन्याय झाला तर भुजबळ हे राजीनामा देणार का? तुम्ही सांगणार का की या कारणामुळे मी राजीनामा देतोय. मंडळच्या विषयाच्या मुद्यावर तुम्ही शिवसेना सोडली होती. बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना जातीपातीचे राजकारण करणार नाही. शिवसेना सोडली होती, आता तुम्ही मंत्रिमंडळ सोडणार का? असे म्हणत संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय.

राज ठाकरे-फडणवीस भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, वर्षावरचा गणपती हा व्यक्तीचा नाही तो मुख्यमंत्री निवासस्थानी विराजमान असलेला परंपरागत असलेला गणपती आहे. राज ठाकरे हे गणेश भक्त आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर आमंत्रण दिले असेल तर जायला काहीच हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button