Rahul Gandhi On GST: मोदी सरकारने आता कमी केला, पण राहुल गांधी आठ वर्षांपूर्वीच म्हणाले होते, 18 टक्के GST मर्यादा सर्वांच्या हिताची, ते ट्विट आणि व्हिडिओ व्हायरल

राहुल यांनी 18 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याची विनंती करतो जेणेकरून गरिबांवर अनावश्यक भार पडू नये! राहुल गांधींच्या त्या विधानाची 2016 मध्ये भाजप आणि मोदी सरकारच्या मंत्र्यांनी खिल्ली उडवली होती.
Rahul Gandhi On GST: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 8 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 मध्ये जीएसटीवर एक महत्त्वाचे ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते, की, जीएसटी हा अप्रत्यक्ष कर म्हणून श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान रीतीने प्रभावित करतो. मी जीएसटी परिषदेला 18 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याची विनंती करतो जेणेकरून गरिबांवर अनावश्यक भार पडू नये! राहुल गांधींच्या त्या विधानाची 2016 मध्ये भाजप आणि मोदी सरकारच्या मंत्र्यांनी खिल्ली उडवली होती. भाजप नेत्यांनी त्यांना पप्पू म्हटले आणि सोनिया टॅक्स असे संबोधून त्यांना ट्रोल केले. 2016 चे राहुल यांचे ट्विट अजूनही भाजपच्या लोकांची खिल्ली उडवत आहे. मोदी सरकारवर अनेकदा राहुल गांधींच्या घोषणा आणि विचारांची नक्कल केल्याचा आरोप केला जातो. पण जीएसटीचा मुद्दा आश्चर्यकारक आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की दिवाळीपर्यंत, पुढच्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमध्ये फक्त दोन दर असतील: 5 आणि 18 टक्के ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी जीएसटी प्रणालीमध्ये पुढील पिढीतील सुधारणांना चालना देण्याच्या उद्देशाने, कमी केलेले कर ओझे सामान्य माणूस, लघु उद्योजक आणि एमएसएमईसाठी दिवाळी भेट असेल.