शिरोळ मंडळ कार्यालयात फेरफार अदालत संपन्न शिरोळ : प्रतिनिधी : महसूल सेवा पंधरवडाअंतर्गत शिरोळ मंडळ कार्यालयात फेरफार अदालत घेण्यात आली. याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ मंडळ अधिकारी कार्यालयात फेरफार अदालत घेण्यात आली.
मंडळ अधिकारी विनायक आरगे, शिरोळ महसूल अधिकारी संभाजी घाटगे, मौजे आगर महसूल अधिकारी आकांशा ढेरे, घालवाड महसूल अधिकारी अश्विनी पाटील, शिरटी महसूल अधिकारी रवी कांबळे, कनवाड महसूल अधिकारी दिगंबर शिकलगार, कुटवाड, हसुर महसूल अधिकारी प्रतापसिंह धोंड, अर्जुनवाड महसुल अधिकारी सत्तार गवंडी या अधिकाऱ्यांनी शिरोळ मंडल कार्यालयांतर्गत असणाऱ्या गावातील नोंदणीकृत नोंदी ४ अनोंदणीकृत २० नोंदी तक्रार नोंद अनोंदणीकृत,२ वारसा ठराव निर्गत करण्यात आले. नोंदी झाल्यानंतर खातेदारांना फेरफारचे वाटप करण्यात आले. या कार्यालयातून राबवण्यात आलेल्या या फेरफार अदालतीबाबत खातेदारांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.





