Nashik News : मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो; नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी, मनसैनिकांकडून चोप,

Nashik News : नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Nashik Crime : सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई सुरू झाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एक आणि दोन मध्ये कोबिंग ऑपरेशन, ऑल आउट मिशन राबवून रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराची चौकशी केली जात आहे. परिमंडळ एकमध्ये राबविलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये 127 रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. त्यातील एकाकडे शस्त्र आढळून आले आहेत तर 32 तडीपार गुंडांपैकी सूरज वर्मा नावाचा तडीपार बेकायदेशीर पणे शहरात वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर परिमंडळ दोन मधील नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 27 छोटे चाकू, कोयता, दोरी आणि तिखटची पावडर आढळून आली आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघे कल्याण तर इतर दोघे जळगावचे आहेत. तर एक आरोपी फरार असून त्याची ओळख अद्याप पटायची आहे. हे सर्व दरोड्याच्या प्रयत्नांत असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे.




