हवामानाच्या स्थितीचा दुर्मिळ योग! राज्यात एवढा पाऊस पडण्याचं कारण काय? नेमकं काय म्हणाले हवामान अभ्यासक?

राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. याबाबतची माहिती हवामान अभ्यासकांनी दिलीय.
Maharashtra Rain News : राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) एवढा पाऊस पडण्याचं नेमकं कारण काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे (Mayuresh Prabhune) आणि उदय देवळाणकर (Uday Deolankar) यांनी एबीपी माझाला दिली आहे.
मान्सून ट्रफची स्थिती
राजस्थान, पंजाब ते बंगालचा उपसागरात मान्सून ट्रफची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळं बंगालच्या उपसागराच्या बाजूला कमी दाबाची क्षेत्र तयार झालं आहे. मान्सून ट्रफ त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिण बाजूला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात दोन कमी दाबाची क्षेत्र तयार झाली आहेत. तसेच दक्षिण गुजरातला चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. एकाच वेळी ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली आहे. मान्सून ट्रफ त्यांच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तर बाजूला असेल तर उत्तर भारतात जास्त पाऊस होतो. पण सध्या मान्सून ट्रफ सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिण बाजूला असल्यानं जोरदार पाऊस पडत आहे.




