महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापुरात पोलिसांसमोर फलकबाजीवरून वर्चस्ववादातून दोन गटाचा नंगानाच; तुंबळ दगडफेक अन् जाळपोळ करत दहशत, वाहनांची तोडफोड

Kolhapur News: हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत.

Kolhapur News: कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकात कमानीजवळ काल रात्री (22 ऑगस्ट) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवस वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापनदिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून काल दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता. या चौकात वर्चस्व कुणाचं यावरुन देखील अनेक वर्ष तरुणांमध्ये वाद आहे. काल सायंकाळी हा वाद उफाळून आला.

ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले

दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संतपलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागून जमाबावर नियंत्रण आणलं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने हा वाद अधिक तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही जमावला पांगवलं. तर काहींना ताब्यात घेतलं आहे. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दगडफेकीत पोलिस जखमी

दरम्यान, वादाला सुरुवात झाल्यानंतरल मोजका पोलिस बंदोबस्त तैनात होता. यावेळी दोन्ही बाजूकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावासमोर पोलिसांची हतबलता झाली. यानंतर अतिरिक कुमक मागवण्यात आली. स्वत: पोलिस अधीक्षक योगेश गुप्ताही दाखल झाले. कोल्हापूर सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत काही पोलिस सुद्धा जखमी झाले आहेत. दगडफेकीत अनेक वाहनांना सुद्धा लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात काचा आणि दगडांचा खच पडला होता. वीज पुरवठा खंडित असल्याने सुद्धा कोण कोणावर दगडफेक करत आहे याबाबत समजून येत नव्हते.

कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

शुक्र स.11 वा.
एका मंडळानं वर्धापन दिनाचा फलक उभारला

शुक्र स.11.30वा.
ध्वनिक्षेपक उभारुन रस्ता अडवण्याचा प्रयत्न

शुक्र दु.12 वा.
सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात

शुक्र दु.1 वा.
पोलिसांकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात

शुक्र सायं.6 वा.
मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी

शुक्र सायं.7 वा.
वर्धापन दिनाचे आणखी तीन नवे फलक उभारले

शुक्र रात्री 9 वा.
साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी

शुक्र रात्री 9.30 वा.
दोन गट समोरासमोर,दगडफेक

शुक्र रात्री 10 वा.
दोन्ही गटाकडून दगडफेक, वाहनांची जाळपोळ

शुक्र रात्री १०.१५ वा.
पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा दाखल

शुक्र रात्री 11 वा.
पोलिसांचा जमावाशी संवाद

शुक्र रात्री 11.15 वा.
सिद्धार्थनगरमधील परिस्थिती नियंत्रणात

शनि.स. 7 वा.
रात्रीपासूनच पोलिसांची गस्त,सकाळी तगडा बंदोबस्त

शनि.स.7 वा.
रात्रीच्या हिंसाचारात 10 वाहनांचे नुकसान समोर

शनि.स. 7 वा.
150 दंगेखोरांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button